मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात पोलिसांची धडक कारवाई; नागरिकांचा जाहीर पाठिंबा!

Rokhthok Maharashtra 40 0

मॉडिफाईड सायलेन्सरविरोधातील कारवाईला नागरिकांचा जाहीर पाठिंबा!
काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट आणि इतर दुचाकींवर करण्यात आलेल्या प्रभावी कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
ससाणे नगर, काळेपडळ, मोहम्मदवाडी रोड, हांडेवाडी रोड तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्णालये, शाळा आणि सोसायट्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
मॉडिफाईड सायलेन्सरमुळे रात्रीच्या वेळी होणारा कर्णकर्कश आवाज, ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांना होणारा त्रास याविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या बैठकीत वैभव माने यांनी नागरिकांच्या वतीने पोलिसांच्या कारवाईला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी काळेपडळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. बाबर साहेब यांनी सोसायट्यांमधील नागरिकांचे प्रश्न व तक्रारी ऐकून त्यावर योग्य निवारण करण्याचे आश्वासन दिले. तसेच नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी आभार मानले.
या प्रसंगी “फोश” मधील ड्रीम्स आकृती, गंगा व्हिलेज, पेबल पार्क, यशरवी पार्क, समृद्धी, वर्धमान, ४८ ईस्ट, ड्रीम्स आशियाना, इशा इताशा एम्पायर, व्यंकटेश क्लासिक, रिदम काउंटी, यश राज, सत्यम निरंजनी, सिंपली सिटी, सेलेन पार्क, फिफ्थ अव्हेन्यू, एलिना यांसह इतर सोसायट्यांमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“सुरक्षित समाज, सक्षम पोलीस आणि जागरूक नागरिक — हीच सुजाण लोकशाहीची खरी ताकद!”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.