बसचालक अन् डॉक्टर ठरले देवदूत! कुरकुंभमध्ये गर्भवतीची सुखरूप प्रसूती

Rokhthok Maharashtra 3 0

बसचालकासह डॉक्टर ठरले देवदूत! कुरकुंभमध्ये गर्भवतीची बसमध्येच वाढल्या कळा; वेळेत उपचार मिळाल्याने सुखरूप प्रसूती

पुण्याहून कर्नाटककडे बसने प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय गर्भवती महिलेला मध्यरात्री अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या.
शुक्रवारी पहाटे सुमारे एक वाजता मोनिका सतीश दुर्गाळे या कुटुंबासोबत कर्नाटकातील भालकीकडे जात होत्या. बस कुरकुंभजवळ आली असता त्यांना अचानक तीव्र कळा सुरू झाल्या.
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थेट कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळवली.
महिला आरोग्य केंद्रात पोहोचताच वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम बनसोडे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. काही वेळातच महिलेची सुखरूप प्रसूती झाली.
आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती सुरक्षित आहे. बसचालकाच्या प्रसंगावधानासह डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.