पुण्यात पहाटे 3.30 वाजेपर्यंत पार्टी; पबवर गुन्हे शाखेचा छापा!
पुण्यातील ‘द हाऊज कम्युन’ पबमध्ये पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केली.
या कारवाईत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी पबमध्ये तब्बल ८९ ग्राहक उपस्थित होते. यामध्ये ६३ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश होता.
कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे १ लाख ६७ हजार रुपयांची दारू आणि ७५ हजार रुपये किमतीची साउंड सिस्टिम जप्त केली.
पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या पार्टीप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.





