बिबवेवाडीत कथित भोंदूबाबावर गंभीर आरोप!

Rokhthok Maharashtra 11 0

बिबवेवाडीत कथित भोंदूबाबाचा प्रताप! दैवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका कुटुंबाचा विश्वास संपादन केल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप बिबवेवाडी परिसरात समोर आला आहे.
या प्रकरणी स्वप्नील लांडे याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणून संबोधत असल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंबाचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असून, प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.