१४ चोरीच्या दुचाकी जप्त; विश्रामबाग पोलिसांची मोठी कारवाई

Rokhthok Maharashtra 9 0

वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. विधीसंघर्षित बालक आणि त्याच्या साथीदारांकडून पुणे शहर, जिल्हा तसेच इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १४ मोटारसायकली, सुमारे १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील अहमदपूर, लातूर येथील कृष्णा चंद्रकांत शेळके, वय २६ वर्षे, याला अटक करण्यात आली असून, त्याच्या विधीसंघर्षित साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासादरम्यान चोरीच्या वाहनांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नारायण पेठ परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. तपासात पुणे आणि इतर ठिकाणांहून विविध वाहनांची चोरी केल्याचे समोर आले. या कारवाईत विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील २, समर्थ पोलीस ठाणे, हडपसर, भारती विद्यापीठ, विमानतळ आणि काळेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक, तसेच इतर जिल्ह्यांतील गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनूजा देशमाने आणि वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे उमेश कारके, सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड आणि उमेश गव्हाणे यांनी कारवाई केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.