गणेशोत्सवात पुणे मेट्रो सुसाट! 7 दिवसांत 25 लाख प्रवाशांचा प्रवास

Rokhthok Maharashtra 7 0

गणेशोत्सवात पुणे मेट्रो सुसाट धावली आहे. अवघ्या सात दिवसांत तब्बल २५ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला असून, मेट्रोला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
१४ ते २० सप्टेंबरदरम्यान पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर एकूण २५ लाख ७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यातून मेट्रोला सुमारे ३ कोटी ७९ लाख रुपयांचा महसूल मिळाला.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, १४ सप्टेंबरला २ लाख ६३ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. तर २० सप्टेंबरला तब्बल ४ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
यामध्ये पर्पल लाइन अर्थात मार्गिका क्रमांक १ वर १३ लाख ४९ हजार, तर ॲक्वा लाइन क्रमांक २ वर ११ लाख ५७ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
पर्पल लाइनवर सुमारे २ कोटी १९ लाख, तर ॲक्वा लाइनवर सुमारे १ कोटी ६१ लाख रुपयांचा महसूल मिळाला.
गणेशोत्सवामुळे मध्यवर्ती पुण्यातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी मेट्रोला मोठी पसंती दिल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.