शेतकऱ्यांना सरसकट मदतं! दोन दिवसांत दुष्काळ मदतीचा GR
वैराग येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीचे उपसभापती संतोष दादा निंबाळकर यांनी निवेदन देत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मका, मूग, कांदा, भुईमूग आणि भाजीपाला या पिकांना फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत, पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडेही तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
येत्या दोन दिवसांत दुष्काळी मदतीबाबत शासन निर्णय म्हणजेच जीआर काढण्यासोबतच, पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संतोष दादा निंबाळकर यांनी सांगितले.
तसेच आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाच्या खंडामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





