PMPML हडपसर डेपोत कामगारांच्या तक्रारी गंभीर!

Rokhthok Maharashtra 12 0

पुण्यातील PMPML हडपसर डेपोतील कामगारांच्या तक्रारींवरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टाईम कीपरकडून हप्त्यांची मागणी, कामगारांवर दादागिरी तसेच मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी कामगारांनी PMPML स्वारगेट मुख्यालयात अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेनेने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अन्यथा कामगारांच्या न्यायासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.