पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक, विश्रांतवाडीत रास्ता रोको

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपातून महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली असून, आरोपीचे नाव जयसिंग भानुदास साठे, वय ५२ असे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी मुलीला तिच्या आईने खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय अहवाल आणि पुरवणी जबाबाच्या आधारे BNS कलम ६५(२) तसेच POCSO कायद्यातील कलम ४, ६ आणि १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रार नोंदवण्यात विलंब आणि सहआरोपी महिलेवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर सुमारे अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस उपायुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.