Bigg Boss फेम दिव्या शिंदेला अटक! डॉक्टरांच्या घरी घुसून मारहाण, 5 लाखांची खंडणी? नेमकं काय घडलं?

Rokhthok Maharashtra 12 0

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करुणादीप फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात दिव्या शिंदे गेली होती. कार्यक्रमामुळे आपल्यामुळे प्रसिद्धी मिळाल्याचा दावा करत तिने ५ लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. डॉक्टरांनी सुरुवातीला ५० हजार रुपये ऑनलाइन दिल्याचेही सांगण्यात आले आहे.
मात्र त्यानंतरही पैशांची मागणी सुरू राहिल्याचा आरोप आहे. गुरुवारी रात्री दिव्या शिंदे काही जणांसोबत डॉक्टरांच्या घरी गेली. काठी आणि बेल्टने मारहाण, घराची तोडफोड आणि ५ लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप FIRमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दिव्या शिंदेला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये बिग बॉस मराठीमधूनही तिची हकालपट्टी झाल्याचा उल्लेख समोर आला आहे. आता या नव्या प्रकरणामुळे दिव्या शिंदे पुन्हा चर्चेत आली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.