धुळ्यात गर्भवती महिलेची हत्या; डोंगरावर मृतदेह जाळला! 11 तास CCTV तपासून पोलिसांनी छडा लावला

Rokhthok Maharashtra 8 0

धुळ्यात कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मृत महिलेचे नाव पिंकी हनुमंत काटकर, वय ३१ असून, त्या जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्राशी संबंधित होत्या.
धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारीजवळील डोंगराळ भागात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनात महिला गर्भवती असल्याचे आणि तिला जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी महामार्गावरील तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून एक ह्युंदाई मोबिलिओ कार संशयाच्या भोवऱ्यात आली.
तपासाचा मागोवा घेत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पिंकीला बीड परिसरात मारहाण झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी राजस्थानला नेण्याची तयारी होती. मात्र धुळ्यातील निर्जन भागात पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या हत्येमागचं नेमकं कारण काय? पोलिस तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.