पप्या शिंदे जेलमध्ये रडला! ‘टल्ली’चं नाव घेतलं; आईचा मोठा दावा

Rokhthok Maharashtra 12 0

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे!
मानपाड्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा मित्र पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात त्याचा हत्येच्या कटातील सहभाग समोर आल्याचं वृत्त आहे.
मात्र, पप्या शिंदेच्या आईने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कोर्टात मुलाला भेटल्यानंतर तो ढसा-ढसा रडत होता आणि त्याने आपल्यासमोर बाळूदादाला गोळ्या घातल्या गेल्याचं सांगितल्याचा दावा आईने केला आहे.
एवढंच नाही, तर पप्या शिंदेने या कटामागे ‘टल्ली’ नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचं सांगितल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे.
आईच्या म्हणण्यानुसार, हा ‘टल्ली’ मीनाक्षी शिंदे यांच्याकडे असतो आणि तो पप्याला वारंवार घेऊन जात होता. ‘टल्लीला पकडलं तर मी निर्दोष सुटेन’, असं पप्या म्हणत असल्याचाही दावा आईने केला आहे.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या पत्नीने पप्या शिंदेवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावरही आरोप झाले असून, त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
आता पप्या शिंदेच्या आईने केलेल्या या दाव्यांची पोलिस तपासात काय पडताळणी होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.