हडपसर येथील एंजल फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय भित्तिपत्रक स्पर्धा उत्साहात संपन्न

Rokhthok Maharashtra 12 0

पुणे, हडपसर : ओम शिक्षण संस्था, हडपसर संचलित एंजल कॉलेज ऑफ फार्मसी येथे राज्यस्तरीय भित्तिपत्रक स्पर्धा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यभरातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वर्ल्ड फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने एंजल कॉलेज ऑफ फार्मसी आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण भित्तिपत्रके सादर केली.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रवीण जावळे, कार्यकारी अध्यक्ष, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, इंडिया उपस्थित होते. तसेच डॉ. नितीन गवई आणि डॉ. तानाजी नांदगुडे यांनी स्पर्धेतील भित्तिपत्रकांचे परीक्षण केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष पं. श्री. शंकर प्रसादजी अग्निहोत्री, सचिव श्री. सचिनजी अग्निहोत्री, संचालक श्री. अविनाश शेलुकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. मोनिका पवार, प्रा. मंगल लाटे, प्रा. करिष्मा टीकारीया, प्रा. ऋषिकेश यांदे, प्रा. युवराज नवखंडे तसेच सौ. उर्मिला तुपे यांनी विशेष मेहनत घेतली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.