हडपसरमध्ये ‘उद्योगवर्धिनी’चा भव्य उपक्रम!

Rokhthok Maharashtra 8 0

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या हडपसर शाखेच्या वतीने 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी *‘उद्योगवर्धिनी’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन* करण्यात आले.
उद्योजकता, स्वावलंबन आणि नव्या संधींना प्रोत्साहन देणाऱ्या या प्रदर्शनात *35 पेक्षा अधिक उद्योजिकांनी* सहभाग घेतला. आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्यासोबतच नव्या संधी मिळाव्यात, यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं.
यावेळी *परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक नितीन दादा गावडे आणि मारोती आबा तुपे* उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायाची माहिती घेतली आणि त्यांच्या कल्पकतेचं व प्रयत्नांचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.