मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकरांसाठी अशोक सराफांनी दिला कोरा चेक; नानांनी सांगितलेला भावुक किस्सा

Rokhthok Maharashtra 8 0

मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकरांच्या संघर्षाच्या काळात अशोक सराफ ठरले आधार!
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. आणि याचदरम्यान नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या खास मैत्रीचे किस्से पुन्हा चर्चेत आले आहेत.
नाना पाटेकर यांच्या संघर्षाच्या काळात अशोक सराफ यांनी त्यांना दिलेली साथ आजही प्रेरणादायी मानली जाते.
रंगभूमीवरील नाटकांच्या दौऱ्यांदरम्यान नाना हे अशोक सराफ यांच्या डोक्याला आणि पायांना तेलाने मालिश करायचे. त्याबदल्यात अशोक सराफ त्यांना पाच रुपये द्यायचे. त्या काळात नानांसाठी हे पाच रुपयेही मोठी मदत होती.
‘हमिदाबाईची कोठी’च्या काळात अशोक सराफ यांना २५० रुपये मानधन मिळायचं, तर नानांना केवळ ५० रुपये. नानांना पैसे मिळावेत म्हणून पत्त्यांच्या खेळात अशोक सराफ मुद्दाम हरायचे, अशी आठवण नानांनी सांगितली होती.
पण खरी गोष्ट तर पुढे आहे…
एकदा नानांना पैशांची गरज असताना अशोक सराफ यांनी त्यांना कोरा चेक दिला. ‘माझ्या खात्यात १५ हजार रुपये आहेत, तुला जितके हवे तितके काढ,’ असं त्यांनी सांगितलं. नानांनी त्यातून तीन हजार रुपये घेतले आणि विशेष म्हणजे ते पैसे अशोक सराफ यांनी पुन्हा कधीही मागितले नाहीत.
मैत्री म्हणजे फक्त सुखात सोबत नव्हे… तर संघर्षाच्या काळात खंबीरपणे उभं राहणं!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.