वाढदिवसाचे औचित्य साधत १,२५० नागरिकांना NCMC कार्डचा लाभ! चंद्रकांत ढमाळ व प्राची ढमाळ यांच्या पुढाकारातून विशेष शिबिराचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फुरसुंगी : वाढदिवसाचे औचित्य साधत नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या NCMC कार्ड शिबिरातून तब्बल १ हजार २५० नागरिकांना लाभ मिळाला. ११ गावांचे प्रथम नगरसेवक गणेश ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरसेवक चंद्रकांत ढमाळ व प्राची ढमाळ यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) NCMC कार्डसाठी आयोजित या शिबिरात नागरिकांची नोंदणी करून कार्ड मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक गणेश ढोरे, नगराध्यक्ष संतोष सरोदे, उपनगराध्यक्ष ओंकार कामठे, गटनेते प्रशांत भाडळे आणि नगरसेवक संतोष पवार यांच्या हस्ते नागरिकांना NCMC कार्डचे वाटप करण्यात आले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अधिक सुलभ आणि सोयीस्कर व्हावा, तसेच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे नगरसेवक चंद्रकांत ढमाळ यांनी सांगितले.
रोखठोक न्युज (गणेश भागीवंत)





