सोलापुरात गाढविणीसोबत प्रतीकात्मक लग्न; तरुणावर गुन्हा दाखल!

Rokhthok Maharashtra 8 0

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासाठी चक्क गाढविणीसोबत प्रतीकात्मक लग्न लावणाऱ्या तरुणावर आता गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही संबंधित तरुणाने आंदोलन केल्याचा आरोप आहे.
ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पूनम गेट परिसरात घडली.
या प्रकरणात दीपक नारायण सूर्यवंशी याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तक्रारीनुसार, आंदोलनादरम्यान गाढविणीला दोरीने बांधून ठेवण्यात आले आणि तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे प्राण्याला वेदना व त्रास देऊन क्रूरतेची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सहाय्यक फौजदार राजेंद्र मरगप्पा बनसोडे यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.
आंदोलनाच्या नावाखाली प्राण्यांशी क्रूर वर्तन केल्याचा आरोप समोर आल्यानंतर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.