राणा सूर्यवंशी रुबी हॉल रुग्णालयातून निघून गेल्याचा दावा; नेमकं काय घडलं?

Rokhthok Maharashtra 9 0

मोठी बातमी! उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्यातील रुग्णालयातून निघून गेल्याचा दावा; पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती!
बारामतीतील गोळीबाराच्या कथित प्रकरणानंतर चर्चेत आलेले राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी हे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून निघून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेशी संबंधित प्रकरणात पोलिसांना त्यांची चौकशी करायची असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, चौकशीपूर्वीच ते रुग्णालयातून निघून गेल्याचे वृत्त आहे. ते नेमके कधी आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णालयातून बाहेर पडले? त्यांच्या जाण्याबाबत रुग्णालय प्रशासनाची भूमिका काय? आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे का?
या सर्व प्रश्नांची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आता राणा सूर्यवंशी नेमके कुठे आहेत? पोलिसांच्या तपासातून काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि पुढील घडामोडींसाठी पाहत राहा… रोखठोक महाराष्ट्र न्यूज!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.