नंदिनी गायकवाड मृत्यू प्रकरण पेटलं! मुंढवा पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा; आरोपींना अटक करण्याची मागणी
मुंढवा हादरलं! नंदिनी गायकवाड मृत्यू प्रकरणी नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा; आरोपींना अटक करण्याची मागणी!
पुण्यातील मुंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुंढवा कॅम्प येथे राहणाऱ्या नंदिनी गायकवाड या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी संतप्त नागरिकांनी मुंढवा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपींना अटक करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील वादानंतर नंदिनी चार दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडली होती. ती चालत कल्याणीनगर परिसरात गेली. तिथे तिने ओळखीच्या एका तरुणाशी फोनवर संपर्क साधला होता. त्यानंतर तिच्यासोबत मारहाण करून तिला नदीत टाकल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुढे तिचा मृतदेह मुंढवा पुलाखाली आढळल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही सुरुवातीला गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची आणि मृत्यूच्या नेमक्या कारणांची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नंदिनीला न्याय मिळणार का? आरोपींवर कारवाई कधी होणार? मुंढवा पोलिसांकडून या प्रकरणात काय पावलं उचलली जाणार? या प्रश्नांची उत्तरं आता महत्त्वाची ठरणार आहेत.





