अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात! कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली

Rokhthok Maharashtra 4 0

नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
पहाटे चारच्या सुमारास अंबाझरी ते सुभाषनगर मार्गावर, अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटजवळ हा अपघात घडला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाचे कठडे तोडत थेट नाल्यात कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.