शरद पवारांना भाजपची ऑफर? राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेत मोठी ट्विस्ट!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मोठ्या राजकीय घडामोडीची चाहूल लागली आहे… शरद पवारांना भाजपकडून महायुतीत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे… आणि दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा पेच कायम आहे!
अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मात्र, विलिनीकरणाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतंत्र पक्ष म्हणून एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यास भाजप तयार असल्याची चर्चा आहे. आगामी हिवाळी अधिवेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या संख्येचं गणितही महत्त्वाचं ठरत आहे.
मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नेतृत्व कुणाकडे असेल? सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल? सत्तावाटप कसं होणार? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
शरद पवार भाजपची ऑफर स्वीकारणार की विलिनीकरणाच्या चर्चेलाच प्राधान्य देणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे!





