पुण्यात उद्घाटनाआधीच 46 हजारांचा दंड! कुलकर्णी पोळी भाजी केंद्र अडचणीत

Rokhthok Maharashtra 4 0

पुण्यात व्यवसाय सुरू करण्याआधीच एका व्यावसायिकाला महापालिकेच्या दंडाचा मोठा झटका बसला आहे. बावधन परिसरातील ‘कुलकर्णी पोळी भाजी केंद्र आणि डायनिंग हॉल’च्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असतानाच पुणे महानगरपालिकेने मालकाला तब्बल ४६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नेमकं प्रकरण काय? तर, बावधनमधील ज्ञानेश्वर रोडवरील विद्यानगर परिसरात या पोळी-भाजी केंद्राच्या उद्घाटनाच्या जाहिरातीसाठी तब्बल २३ बॅनर लावण्यात आले होते. मात्र, हे बॅनर लावण्यासाठी पुणे महापालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती.
याची दखल घेत महापालिकेने २६ नोव्हेंबर रोजी संबंधित मालकाला नोटीस बजावली. तसेच, तीन दिवसांच्या आत ४६ हजार रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश दिले.
त्यामुळे उद्घाटनाचा आनंद साजरा करण्याआधीच मालकाला महापालिकेच्या दंडाचा सामना करावा लागला आहे. आता या प्रकरणात संबंधित मालक दंड भरतो की पुढे काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.