बारामती

चिमुकल्यांच्या कलाविष्कार आला रसिकांची दाद

रोखठोक महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन

बारामती – (प्रतिनिधी)
आकर्षक विद्युत रोषणाई बहुरंगी वेशभूषा आणि चिमुकल्या कलाकारांचा रॅम्प वॉक सादर करत पालकांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. युथ व्हिजन या संस्थेने बारामती किड्स फॅशन शो चे आयोजन बारामती यांनी केले होते या मुलांच्या कलाविष्कार पालकांचा वाढता उत्साह यामुळे कार्यक्रम उत्तररंगात भरत गेली होती कार्यक्रमाचे उद्घाटन बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमाताई तावरे यांनी केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून नाळ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे उपस्थित होता.तसेच संगीत सम्राट विजेता सागर कुडाळकर व सिने अभिनेत्री पुनम कापसे,पुजा घाग याही उपस्थित होत्या. सागर कुडाळकर व प्रतीक ढाले यांच्या सुमधूर संगीताने श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाला धनराज गवळी, धनंजय पाटील ,सिद्धार्थ पाटील भारती मुथा, रामेश्वरी जाधव, वर्षा कोठारी, डॉ.सौरभ मुथा, प्रमोद खटावकर, शेखर काकडे, योगेश नालंदे, सचिन सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष अतुल साबळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित किकले, प्रवीण बर्गे रामेश्वर मोरे ऋषिकेश लोणकर प्रशांत भागवत, पारस मेथा, रोहित शहा करण भापकर, सुमित बेलसरे ,रिकुल सोनी दीपक गणबोटे प्रयत्न केले

विजेते नाव- प्रथम क्रमांक-मायरा शेख
द्वितीय क्रमांक-गुरु उदावंत
तृतीय क्रमांक-शिवराज ननवरे

ओपन राऊंड- स्पृहा नलावडे, आदित्य धर्माधिकारी, अश्विनी जाधव

0 0 votes
Article Rating
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments