Uncategorized

व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा गजाआड ; हडपसर औद्योगिक वसाहत मधील घटना : हडपसर पोलिसांनी केली कारवाई

रोखठोक महाराष्ट्र न्यूज
पुणे/हडपसर (प्रतिनिधी)
हडपसर औद्योगिक वसाहत मध्ये श्रीकृष्ण अग्रो कंपनीच्या मालकास कंपनी चालवायची असेल तर मला हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिल्याप्रकरणी खंडणी मागितली म्हणून हडपसर पोलिसांनी एका आरोपीस गजाआड केले आहे.
सिद्धेश्वर चव्हाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर मधील औद्योगिक वसाहत मध्ये श्रीकृष्ण अग्रो नावाची कंपनी आहे या कंपनीमध्ये 18 फेब्रुवारी रोजी आरोपी सिद्धेश्वर चव्हाण याने कंपनीमध्ये जाऊन कंपनी चालवायची असेल तर दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशा पद्धतीने खंडणीची मागणी केली. फिर्यादीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला
तपास पथकाने तातडीने हालचाल करून या आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले व अटक केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त सुहास बावचे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार रमेश साबळे, पोलीस शिपाई अनिल कुसाळकर, पोलीस शिपाई विजय पवार, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते पोलीस शिपाई अमित कांबळे पोलीस शिपाई प्रशांत नरसाळे यांनी केली.

0 0 votes
Article Rating
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments