महाराष्ट्र

कोरोना व्हायरस ने घेतला दुसरा बळी दिल्लीतील 65 वर्षाच्या महिलेचा झाला मृत्यू

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
करोना व्हायरसचा भारतातला दुसरा बळी गेला आहे. दिल्ली येथे करोनाची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला 65 वर्षांची होती. दिल्ली येथील रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच या महिलेचा मृत्यू झाला आहे. एएऩआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ही महिला पश्चिम दिल्लीत राहणारी होती. तिचा मुलगा स्वित्झर्लंड येथून परतला होता. ही महिला त्याच्या संपर्कात आल्याने तिला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णायलात तिला दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाचीही करोनाची लागण झाली आहे की नाही याबाबतची चाचणी करण्यात आली होती. 9 मार्चला या महिलेची प्रकृती खालावली. या महिलेला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र आज अखेर तिचा मृत्यू झाला.

करोना व्हायरसने चीनसह जगभरात थैमान घातले आहे. करोना विषाणूने भारतात गुरुवारी पहिला बळी घेतला होता. त्यानंतर आज या विषाणूने दुसरा बळी घेतला आहे. कर्नाटकमध्ये उपचारादरम्यान एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी गुरुवारी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता दिल्लीत एका महिलेचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातही करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या पाठोपाठ अहमदनगरमध्येही करोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या 17 वरुन 18 वर गेली आहे.

0 0 votes
Article Rating
136 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments