पुणे

साधना बँकेच्या अध्यक्षपदी अनिल तुपे, उपाध्यक्षपदी आबा कापरे बिनविरोध

पुणे (प्रतिनिधी)
हडपसर येथील साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अनिल रतन तुपे यांची तर उपाध्यक्षपदी हनुमंत उर्फ आबा कापरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या अधिकार कक्षेत सहकारी संस्था पुणे शहराचे सहाय्यक निबंधक ए. एन. अनपट यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली यावेळी सुकाणू समिती सदस्य पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष दिलीप आबा तुपे, आमदार चेतन तुपे पाटील, बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
साधना सहकारी बँक ही गेली चाळीस वर्षे पुण्याच्या पूर्व भागात आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली बँक आहे, बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून महाराष्ट्रामध्ये 27 शाखा व एक विस्तारीत कक्ष असा बँकेचा विस्तार आहे.
बँकेकडे 460 कोटींच्या ठेवी असून 297 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे
बँकेला सतत ऑडीट वर्ग “अ” असून गेली 14 वर्षे शून्य टक्के एन पी ए ठेवला आहे. सभासदांना दरवर्षी दहा टक्के लाभांश दिला जात आहे, सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी, कुटुंबनियोजन अनुदान सभासदांच्या पाल्याकरिता शैक्षणिक अनुदान, दुर्धर आजारासाठी आर्थिक अनुदान अशा स्वरूपाच्या सेवा सुरू केल्या आहेत अशी माहिती यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल तुपे यांनी दिली.

0 0 votes
Article Rating
286 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Aaron
1 year ago

kinky lady loves fetish and free online live sex chat rooms.let me know how i can please you