पुणे

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर व तोंडावरील शाईफेकी प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जणांचं निलंबन, सुरक्षेत कसूर ठेवल्याचा ठेवत…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

काल पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर तसेंच अंगावर शाई फेक प्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 7 जणांना निलंबित करण्यात आलं आहे, सुरक्षेत कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते.

10 डिसें, 2022 रोजी पिंपरीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली, गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आले असता एका भीम सैनिकाने त्यांच्यावर शाई फेकून संताप व्यक्त केला, यामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

चंद्रकांत पाटील शाईफेकी प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जणांचं निलंबन करण्यात आलं असे, सुरक्षेत कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ही कारवाई केली असे समजते.