पुणे

पुणे बंद पूर्वतयारीसाठी हडपसर मध्ये सर्वपक्षीय बैठक शिवप्रेमी संघटना, सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
श्रद्धा असेल तर बेताल वक्तव्य मुखातून बाहेर पडणार नाही, महापुरुषांची बदनामी करणारे प्रशिक्षण देणारे घटना साडे तीनशे वर्षांपासून आज तागायत दिले जात आहेत. ते रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी व
एक दिवस महापुरुषांच्या सन्मानासाठी बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आमदार चेतन तुपे यांनी बैठकीमध्ये आव्हान केले. महापुरुषांच्या बाबत बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता दिनांक १३ तारखेच्या पुणे बंदच्या हाकेला हडपसर मधील सर्व संघटना, सामजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी हडपसर माळवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील जिम्नेशन हॉलमध्ये बैठका घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत हडपसर साधना विद्यालय मध्ये सर्व सामाजिक संघटनेचा प्रतिनिधीची बैठक आयोजित केली होती. यावेळीआमदार चेतन तुपे, योगेश ससाणे, महेश टेळे, संदीप लहाने पाटील, उत्तम कामठे, प्रशांत सुरसे, हनुमंत मोटे, विठ्ठल सातव, फारुख इनामदार, महेंद्र बनकर, साधना शिंदे, विद्या होडे, डॉ.शंतनु जगदाळे, दिलीप गायकवाड, तुकाराम शिंदे, इम्रान शेख, रमजान शेख, बळीराम डोळे, व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. हडपसर भाजी मंडई व्यापारी मंडळाने ही बैठक घेऊन १३ तारखेला बंद मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर वानवडी परिसरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. असे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले.
बंद मध्ये सर्व शिवप्रेमी संघटनांच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद मध्ये करण्यात आले आहे.