Uncategorizedपुणे

पुणेरी पाट्याच काय पुणेरी बॅनरबाजी सुध्दा प्रसिद्धीच्या झोतात !

अख्या महाराष्ट्रात पुणेरी पाट्या सुप्रसिद्ध आहेत ते पुणेकरांच्या स्वभावामुळे ! पुणेकर बोलण्यात सडेतोड तसेच त्यांच्या वाड्यावर, घरावर, बंगल्याच्या गेटवरिल पाट्या प्रसिद्ध आहेत हे जसे माहिती आहे तद्वतच आता पुणेकर बॅनरबाजीसाठी सुध्दा प्रसिध्दीच्या झोतात येत आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. एखादा छोटा मोठा कार्यकर्ता सुध्दा वेगवेगळ्या ढंगाने स्वतः चा बॅनर तयार करून घेतो व जेथे जागा मिळेल तेथे लावतो तर काही वेळा लटकवतो हे येथील रहिवाशांना चांगलेच ज्ञात आहे. कुठलाही राष्ट्रीय वा धार्मिक सण असो, नेत्यांचा वाढदिवस असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम असो बॅनरबाजी शिवाय मजा नाही हे गणित मात्र पक्क ! त्यामुळे बॅनरबाजी पुण्यात काही नवीन नाही.

आपल्या वाढदिवसाच्या बॅनरसाठी समजा कार्यकर्ते मिळाले नाही तर त्यावेळी शुभेच्छुक म्हणून मित्रमंडळी(वयाची अट नाही), आपल्या कुटुंबातील मूलबाळ सुध्दा चालतात बर का ! येथे दाटी वाटीने फोटोची रेलचेल पहावयास मिळते. मग घरातील कुटुंब खुश व स्वतःचा छानदार फोटो झळकल्याने मित्रमंडळी व स्वारीही खुश.

राजकारण करणाऱ्याचे तर विचारायला नको. असलेल्या आणि नसलेल्या ब्रीदावली लावून मोठमोठे बॅनर लावलेले दिसून येतात. या बॅनरबाजीमुळे मात्र पेंटरच्या कमाई वर मात्र गदा आली आहे.

 

पुर्वीही पुण्यात काही बॅनर लागलेले असायचे, परंतु ते पेंटरने रंगवलेले कापड अथवा भिंतीवर लिहिलेले असायचे. आता काळ बदलला आहे आधुनिक पध्दतीने पुणेरी पाट्याच काय पुणेरी बॅनरसुध्दा प्रसिद्ध असतात !

कुठलाही राष्ट्रीय वा धार्मिक सण असो, नेत्यांचा वाढदिवस असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम असो बॅनरबाजी शिवाय मजा नाही हे गणित मात्र पक्क ! त्यामुळे बॅनरबाजी पुण्यात काही नवीन नाही.

राजकारण करणाऱ्याचे तर विचारायला नको. असलेल्या आणि नसलेल्या ब्रीदावली लावून मोठमोठे बॅनर लावलेले दिसून येतात. या बॅनरबाजीमुळे मात्र पेंटरच्या कमाई वर मात्र गदा आली आहे.

 

आता तर कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार ठरवतात निष्ठावान कार्यकर्ते. …मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही ! धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त” !

विधानसभा निवडणुका दुरवर असताना (कधी होतील माहिती नाही) आपला नेता किती पावरफूल आहे तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे दाखवण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे प्रत्येक पक्षाचे सध्या तरी मुख्यमंत्री ठरले असावेत ! या स्पर्धेमुळे मात्र नागरिकांची करमणूक होते आहे तर पत्रकारांसाठी एक ब्रेकिंग न्युज/ बातमी ठरत आहे !

सुधीर मेथेकर,
हडपसर, पुणे