पुणे

पुण्यात निषेध मुक मोर्चात खासदार उदयनराजे भोसले, माजी न्यायाधीश बी.जी.कोळसेपाटील यांनी घेतला सहभाग…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

छत्रपती शिवाजी,महाराज महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगत सिंग कोशारी, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मंगल प्रभात लोढा,तसेंच भाजपा प्रवक्ता त्रिवेदी अशा भाजपच्या वाचाळविरांच्या अक्षपार्ह केलेल्या विधानांच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोर्चामध्ये खासदार उदयनराजे भोसले, माजी.न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पुण्याचे माजी. उपमहापौर दीपक भाऊ मानकर, माजी आमदार जयदेवजी गायकवाड, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या समावेत पुणे बंद मध्ये सहभाग घेताना संघटनेच्या महिला कार्यकर्ते व दलित महिला संघर्ष समितीच्या शहराध्यक्ष सुरेखाताई कांबळे -पाखरे इत्यादी कारकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.