पुणे

“डॉक्टर्स प्रिमियर लिग स्पर्धेत हडपसर वॉरियर्स संघाला विजेतेपद प्राप्त…

पुणे :- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
उमंग ivf हॉस्पिटल व हडपसर वॉरियर्स ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉक्टर्स प्रिमियर लिग स्पर्धेत हडपसर वॉरियर्स संघाला विजेतेपद प्राप्त झाले आहे.
डॉ निरंजन रेवडकर ह्यांच्या नेतृत्वाखालील हडपसर वॉरियर्स संघाने सिंहगड लायन्स संघाला १७ धावांनी पराभूत करुन विजेतेपद पटकावले. १६ डिसेंबर रोजी पीजी क्रिकेट अकाडेमी च्या ग्राऊंडवर उपांत्य व अंतिम सामना खेळण्यात आला. बारामती सुपर किंग्स विरुद्ध हडपसर वॉरियर्स तसेच क्षितिज ११ विरुद्ध सिंहगड लायन्स ह्या उपांत्य सामन्यांमध्ये हडपसर वॉरियर्स व सिंहगड लायन्स ह्यांनी विजय संपादन करुन अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात हडपसर वॉरियर्स संघाने १०३ धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना हडपसर वॉरियर्स संघाच्या अचुक टप्प्याच्या गोलंदाजीसमोर सिंहगड लायन्स संघ अपयशी ठरला.
स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतला. हडपसर वॉरियर्स संघाला रोख ३१००० रुपये व करंडक प्रदान करण्यात आला. सिंहगड लायन्स संघाला २१००० रुपये व करंडक, तर तृतीय क्रमांकावरील बारामती सुपर किंग्स संघाला ११००० रुपये व करंडक प्रदान करण्यात आला. मॅन ऑफ द सिरीज व बेस्ट ब्याटसमन पुरस्कार डॉ विनोद कांबिरे ह्यांना तर बेस्ट बॉलर पुरस्कार डॉ रोहन देशपांडे ह्यांना देण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक राहूल श्रीरामे साहेब , उमंग हॉस्पिटल चे डॉ विशाल गावडे सर व डॉ आशा गावडे मॅडम, हडपसर मेडीकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सचिन आबणे व उपाध्यक्ष डॉ राहुल झांजुर्णे उपस्थित होते.
ह्या स्पर्धेचे आयोजन डॉ निरंजन रेवडकर, डॉ कुलभूषण शितोळे, डॉ. विनोद कांबिरे, डॉ सतिश मदने ह्यांनी केले होते. डॉ तानाजी हंबिर व डॉ शंतनु जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले होते. कर्णधार डॉ. निरंजन रेवडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. सतिश मदने (उपकर्णधार), डॉ.विनोद कांबीरे, डॉ.कुलभूषण शितोळे (विकेटकीपर), डॉ.रोहन देशपांडे, डॉ.प्रविशाल आदलिंग, डॉ.तानाजी हंबीर, डॉ.शंतनू जगदाळे, डॉ.शैलेंद्र शिंदे, डॉ.सुरज मोरे, डॉ.गंगासागर कोळपे, डॉ.नानासाहेब कोळपे, डॉ. प्रदीप जाधव, डॉ.रसिक झांजे, यांचा हडपसर वॉरियर्स संघात समावेश होता.