पुणे

लोणी काळभोर येथिल रामा कृषी रसायन कंपनीमध्ये वेतनवाढ करार संपन्न,१३१०१ रूपये वेतन वाढ मंजुर

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर -येथील शेती उपयोगी खत उत्पादक रामा कृषी रसायन कंपनीमध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला असून एकुण १३१०१ रुपये वेतनवाढ करण्यात आली आहे. 

                        या संदर्भात सविस्तर माहिती व्यवस्थापक व्हि के पांडे यांनी दिली. ते म्हणाले सन २०२१ – २४ या तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यामध्ये हा करार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापक व्हि के पांडे, आर एन शर्मा तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष आर बी काळभोर, सरचिटणीस आर. आर. उरमोडे, उपाध्यक्ष जी जी जाधव, ए के गरगडे,  सहचिटणीस एन के पडघणे, जी एन चिंतोले, खजिनदार जे बी धुमाळ, लेखापरीक्षक आर बी खैरे यांनी सह्या केल्या.