Uncategorizedपुणे

दलित महिला सुरक्षा संघर्ष समितीच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

भारतातील पहिली महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गंज पेठ येथील महात्मा फुले वाड्यातील महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास दलित महिला सुरक्षा संघर्ष समितीचे संस्थापिका अध्यक्षा सुरेखाताई कांबळे तसेंच भाजप च्या महिला आघाडीच्या चित्रा ताई वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या पथारी व्यवसायिक सदस्य पदी निवडुन आलेल्या नीलम अय्यर, तसेच कमल जगधने व आंबेडकरी चळवळीमध्ये महिलांना बरोबर पुढे घेऊन न्याय हक्केसाठी लढणाऱ्या मंगलताई सोनावणे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,यावेळी मंदा साळुंखे, पिंकी पाडळे, ऍड. वैशाली देशमाने, माधुरी कांबळे, सारिका रोकडे, अनिता पवार आदी उपस्थित होते.