Uncategorizedपुणे

“पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना धक्का दहशत पसरणाऱ्या कोयता गँग विरुद्ध मोक्कानुसार कारवाई – हडपसरच्या आरोपींची जेलवारी”

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन )
शहरातील हडपसर परिसरात संघटित गुन्हेगारी करून कोयत्याचा धाकाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा टोळी विरुद्ध मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग विरुद्ध मोक्कानुसार कारवाई करत टोळ्यांना इशारा दिला आहे दरम्यान कोयता गॅंग टोळी विरुद्ध कारवाईमुळे अल्पवयीन आरोपींमध्ये दहशत निर्माण होण्यास मदत होणार आहे.
समीर लियाकत पठाण वय 26 (टोळीप्रमुख), यांच्या सह शोएब लियाकत पठाण, गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार वय 22 रा. मांजरी, प्रतीक उर्फ एस के हनुमंत कांबळे वय 20 रा. साई श्रद्धा पार्क गोपाळपट्टी, मांजरी, गितेश दशरथ सोलनकर वय 21, ऋतिक संतोष जाधव वय 19, राजेंद्र कांबळे वय 20, ऋषिकेश उर्फ सोन्या संजय पकाले वय 24, ऋतिक सुनील मांढरे, वय 22 प्रतिक शिवकुमार सलगर वय 19, अशी मोक्का नुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हडपसर मधील मांजरी बुद्रुक परिसरात आठ ते दहा जणांच्या टोक्याने दोघांना बेदम मारहाण करीत नागरिकांना शिव्या गाळ केली होती मोटर सायकलवरून पळून जाताना कोयता हवेत फिरवत नागरिकांना आम्ही इथले भाई आहे तुम्हाला परत येऊन बघतो असे म्हणत दशरथ निर्माण केली या प्रकरणी मुख्य आरोपी समीर लियाकत पठाण आणि इतर गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार यांच्यावर शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दरोडा मारामारी जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या वतीने अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा यांना पाठविला त्यानुसार टोळी विरुद्ध मोक्का नुसार कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तपास करीत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, समीर पांडुळे शाहीद शेख, हंबर्डे, दुधाळ, सोनवणे, सर्व्हेलन्स विभागाचे पोलीस अंमलदार, प्रवीण शिंदे, गिरीश एकोर्गे यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची दुसरी मोक्का कारवाई…
पुणे आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार मुक्काम अंतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे.

शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्राधान्य देण्यात आले आहे विशेषता: कोयता गँग विरुद्ध कारवाई करून टोळ्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीची माहिती द्यावी आम्ही आपल्या सुरक्षितेसाठी सदैव दक्ष आहोत.
रितेश कुमार – पोलीस आयुक्त पुणे शहर

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लोकसंख्या खूप वाढली आहे चार पोलीस स्टेशन चा कारभार या हडपसर हद्दीत आहे तरीही हडपसरचे पोलीस गुन्हेगारीवर आळा बसवण्यास पूर्णपणे सशक्त आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आहोत सामान्य नागरिकांना गुन्हेगारांच्या दहशतीपासून वाचवणे व गुन्हेगाराचा बिमोड करणे हे आमचे कर्तव्य आहे कोयता गँगचा आज कायमचा बंदोबस्त केला आहे हडपसर हद्दीत जर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल.
अरविंद गोकुळे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हडपसर पोलीस स्टेशन