पुणे

हार्मनी इव्हेंट्स या संस्थेतर्फे सर्वांना सुपर सिंगर होण्याची सुवर्णसंधी…!

पुणे :प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

हार्मनी इव्हेंट्स ‘ या संस्थेतर्फे ‘सुपर सिंगर करा ओके गीत गायन स्पर्धा ‘आयोजित करण्यात आली आहे, शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा चैतन्य सभागृह, चिंचवड येथे होणार असून स्पर्धेमध्ये स्पर्धकाला आपल्या आवडीच्या गाण्याचे ध्रुव पद आणि एक अंतरा गायचा आहे, त्याचा ट्रॅक पुढील क्रमांकावर २० जानेवारी पर्यंत पाठवायचा आहे, नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क अपूर्वा 9850718205, आरती 9822709730 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील वयोगटातील लोक स्पर्धेत भाग घेऊ शकतात १२ ते २०, २१ ते ४०, ४१ ते ६० आणि ६० ते ८० या वयोगटात ही स्पर्धा होणार आहे, विजेत्यांना ‘सुपर सिंगर’ हा मानाचा किताब,ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,अशी माहिती ‘हार्मनी इव्हेंट्स’ च्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे,नवोदित आणि हौशी गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.