पुणे

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर तलवार,कोयत्यासह रिल्स बनवणाऱ्या चौघांना अटक

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

शिक्रापूर- शिक्रापूर सोशल मिडीयावर तलवार व कोयत्यासह : रिल्स बनवून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता तीन मुले हातात कोयता व तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून दोन मुलांना एक कोयता व एक तलवारीसह अटक केली आहे. तर पोलिस अजून एकाचा शोध घेत आहे.

दरम्यान, पळून गेलेल्या तिसऱ्या आरोपीला ताब्यात

घेतल्यानंतर तिघांची एकत्र कसून चौकशी करण्यात येणार आहे. कारण त्यांच्यासोबत आणखी काही तरुणांचा संपर्क असणार असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे पोलिस तिसया तरुणाचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा आणि पुण्यात फिरणाऱ्या तलवार घेऊन तरुणांचा काही संबंध आहे का ? याची सुद्धा चौकशी होणार आहे.