पुणे

वढू–तुळापूरचा कायापालट | ५३२ कोटींचा ऐतिहासिक विकास

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वसलेले तुळापूर हे केवळ एक गाव नाही, तर स्वराज्याच्या इतिहासाचे पवित्र साक्षीदार आहे.
भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले तुळापूर, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे इतिहासात अजरामर झाले आहे.
याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अमानुषपणे ठार मारले.
समोर नदीपलीकडे शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक, जिथे धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे.
या दोन गावांमधून वाहणारी भीमा नदी आज इतिहास, श्रद्धा आणि विकासाला जोडणारा दुवा ठरणार आहे.
👉 शासनाकडून तब्बल ५३२.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वढू–तुळापूर परिसराचा संपूर्ण कायापालट होणार आहे.
या विकास आराखड्यात — तुळापूर येथील बलिदान स्थळी
✔ संग्रहालय
✔ थ्री-डी शो सभागृह
✔ प्रशासकीय इमारत
✔ ग्रंथालय
✔ स्मरणिका दुकाने
✔ भव्य प्रवेशद्वार
✔ नदी घाट
✔ वाहनतळ, शौचालय आणि उपहारगृह तर वढू बुद्रुक येथील समाधी स्थळी देखील
✔ संग्रहालय
✔ प्रशासकीय इमारत
✔ स्मरणिका दुकाने
✔ नदी घाट व सुविधा विकसित केल्या जात आहेत.

 

 

 

दोन्ही गावांना जोडणारा भीमा नदीवरील पूल आणि रस्ते विकास हा या आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी शंभर फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज फडकणार असून, शिरूर आणि हवेली तालुक्याला नवे वैभव प्राप्त होणार आहे.
या विकासामुळे देशभरातून येणाऱ्या शंभू भक्तांची संख्या वाढणार, हॉटेल, दुकाने, पर्यटन व्यवसाय फोफावणार, आणि स्थानिक शेतकऱ्यांना भाजीपाला व लघुउद्योगातून नवे उत्पन्नाचे मार्ग खुल्या होणार आहेत.
👉 सध्या विकास आराखड्याचे काम जोरात सुरू असून,
इतिहास, श्रद्धा आणि विकास यांचा संगम असलेले वढू–तुळापूर लवकरच जागतिक दर्जाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून उभे राहणार आहे.