पुणे

भाषणबाजीसाठी राज ठाकरेंना राष्ट्रवादीने विधानसभेच्या 25 जागांची दिली सुपारी : खा. संजय काकडे यांचा आरोप….

 

भिगवण (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात सभा घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी दिली असल्याचा घणाघात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. राज ठाकरेंना राष्ट्रवादीने दिलेली सुपारी जमिनी किंवा पैशांच्या स्वरुपात नसून ती विधानसभेच्या 25 जागांची असल्याचा आरोप संजय काकडेंनी केला.

महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाहांची पुण्यातील भिगवणमध्ये सभा पार पडली, संजय काकडेंनी यावेळी आपल्या भाषणात राज ठाकरेंवर निशाणा साधला. अमितभाई इतका धसका या लोकांना बसला आहे, की भाड्याने आणि सुपारी देणे यांनी सुरु केले आहे ,ही सुपारी राज ठाकरे नावाच्या व्यक्तीला दिली आहे. सुपारी देणे म्हणजे पैसे देणे,जागा देणे… तर यांनी नवीन सुपारी दिली, तुझे 25 सभासद आम्ही विधानसभेवर पाठवू. तुझ्यासोबत युती करु, 25 ते 30 जागा तुला विधानसभेच्या देऊ, असे आमिष राष्ट्रवादीने राज ठाकरेंना दिल्याचा दावा संजय काकडेंनी केला.

तो आपल्या मोदीसाहेबांबद्दल, अमित शाहांबद्दल वायफळ बोलतो. जो व्यक्ती बोलत आहे, त्याचा एकही खासदार ना, एकही आमदार आहे, मुंबईत एक नगरसेवक, पुण्यात दोन नगरसेवक, नाशिकला चार नगरसेवक. ज्यांना स्वतःचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत,आपले उमेदवार ते काय पाडणार ?’ असा सवाल करत संजय काकडेंनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

Hi my loved one! I wish to say that this post is awesome, nice written and come with
approximately all significant infos. I’d like to peer
extra posts like this .

9 months ago

I know this web site presents quality dependent posts and other stuff, is there any other web page which offers these things in quality?

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x