महाराष्ट्र

करकरे यांचे मरण आणि साध्वी प्रज्ञासिंगचे सुतक फिटण्याचा काय संबंध ? सुदाम राठोड यांचा रोखठोक पंचनामा

 

(रोखठोक महाराष्ट्र विशेष न्युज)-

21 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला. नेमके तीन महिन्यापूर्वीच एटीएसच्या प्रमुख पदाचा भार हेमंत करकरे यांच्याकडे आला होता. त्यांनी घटनास्थळाचे बारीक निरीक्षण केले असता त्यांना स्फोटात वापरलेली मोटारसायकल सापडली. शोध घेतला असता त्या मोटारसायकलची मालक निघाली साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर. करकरेंनी प्रज्ञासिंगला ताबडतोब अटक केली. चौकशी केली असता तिचे अभाविप, अभिनव भारत, विश्व हिंदू परिषद यांच्याशी असणारे संबंध उघड झाले. तसेच शामलाल साहू आणि शिवनारायण कलसंगरा यांची नावेही पुढे आली. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता ले.कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, महंत दयानंद पांडे, समीर कुलकर्णी अशा एकूण अकरा हिंदुत्ववाद्यांचा मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग आढळला. हे सगळे RSS व BJP शी संबंधित होते,तसे पुरावेही निष्पन्न झाले.

चौकशी दरम्यान करकरेंना ले.कर्नल पुरोहित व महंत दयानंद पांडे यांच्याकडून दोन लॅपटॉप मिळाले. त्यातली माहिती पाहून करकरेंना धक्काच बसला. कारण कट्टर ब्राम्हणवाद्यांनी मिळून अभिनव भारत नावाची एक दहशतवादी संघटना स्थापन केलेली होती आणि त्याद्वारे त्यांना भारतीय राज्यघटना मोडीत काढून वैदिक मनुस्मृतीवर आधारित आर्यावर्त हिंदू राष्ट्र स्थापन करायचे होते.

2002 पासून त्यांनी अनेक दहशतवादी कृत्ये केली होती आणि मुस्लिम दहशतवाद्यांची नावे पुढे केली होती. त्यासाठी त्यांनी दिल्ली, फरिदाबाद, कलकत्ता,भोपाळ, नाशिक आदीसह अन्य वीस ठिकाणी मिटिंग घेऊन संघटनेची रचना, उद्दिष्टे, तरुणांना भरती करण्याची पद्धत, शस्र व स्फोटके यांचे प्रशिक्षण,संघटनेकडे आरडीएक्सचा उपलब्ध साठा, आर्थिक मदत वगैरेची नोंद केलेली होती. त्यासंदर्भात 24 व्हिडीओ आणि 24 ऑडिओ करकरेंनी ताब्यात घेऊन त्याचे शब्दांकन करणे सुरु केले होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत ते 3 व्हिडीओ व 2 ऑडिओ क्लिपचे शब्दांकन करून कोर्टात सादर करू शकले.

प्रज्ञासिंग ठाकूरसह अनेक जण या कटात सहभागी असल्याचे पुरावे करकरेंकडे होते. म्हणून करकरेंची नियोजनपूर्वक हत्या घडवून आणली गेली आणि नाव मात्र पाकिस्तानी दहशतवाद्यांचे दिले गेले.
ते जिवंत असते तर प्रज्ञासिंग ठाकूर कधीच सुटू शकली नसती. म्हणून करकरे मेले व तिचे सुतक फिटले. नसता हे सुतक RSS सहित BJPलाही फिटले नसते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x