पुणेमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात ‘संविधान दिन’ साजरा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान सभेने भारतीय संविधान निर्माण केले. दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हे संविधान देशाला अर्पण केले. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दर वर्षी संविधान दिन साजरा केला जातो.

 

यावर्षीही संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत जगताप यांनी उपेक्षित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना लोकशाही मूल्यांचे जतन करून संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मा. जयदेवराव गायकवाड़, भगवानराव सालुंखे, डॉ. सुनील जगताप, किशोर काम्बले, रोहन पायगुड़े, सुवर्णाताई माने संजय गाड़े आदि मान्यवर उपस्थित होते.