पुणेहडपसर

विधिसंघर्षित बालक ताब्यात, वाहनचोराला ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कामगिरी ः
पुणे, दि. 27 ः चार घरफोड्या करणाऱ्या विधीसंघर्षिताला ताब्यात घेतले असून, वाहनचोरी करणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रणव प्रशांत शेजुळ (वय 19, रा. लोणी टोळनाक्याजवळ, कामठेवस्ती, लोणी काळभोर, मूळ गाव- श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीवर चार गुन्हे उघडकीस आणले असून, पाच गुन्हे दाखल आहेत. 52 हजार रुपये किमतीची अॅक्टिवा जप्त केली.

 

पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संशयित विधिसंघर्षित बालक पाण्याची मोटार घेऊन जाताना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चार घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. वाहनचोरी करणाऱ्याला अटक करून 52 हजार रुपयांची अॅक्टिव्हा जप्त केली.

 

सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, ज्योतिबा पवार, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलिक केसकर, रशिद शेख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.