महाराष्ट्र

धनगर समाजाला आदिवासी योजना लागू होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

‎‎‍

रोखठोक महाराष्ट्र न्युज

मुंबई : धनगर समाजाला आदिवासीच्या योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. आदिवासी समाजाच्या योजनांना धक्का न लावता राज्यात १० ठिकाणी  स्वतंत्र शासकीय आश्रमशाळा, प्रत्येक विभागात विध्यार्थी वसतीगृह, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, भूमिहीनांना जमीन खरेदीसाठी अर्थसाह्य, पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुले आदी महत्वपूर्ण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज  सह्याद्री अतिथीगृहामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची  धनगर आरक्षणांसंदर्भात बैठक  पार पडली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंधारण मंत्री राम शिंदे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचा विस्तार करण्यात आला असून, यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास तथा मेंढी व शेळी महामंडळ असे नामकरण करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी परवानगी दिली आहे. धनगर समाजाची लोकसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे तेथे चराई क्षेत्र राखीव ठेवण्यास मान्यता दिली आहे.धनगर समाजाला आदिवासीच्या योजना लागू करण्यात आल्या असून आदिवासीच्या निधीस धक्का न लागू देता स्वतंत्र निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यावर एकमत या बैठकीत झाले. त्याची अधिसूचना येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात येणार असून रीतसर कार्यक्रम ६ मार्चला होणार आहे. आदिवासी समाजाच्या योजना धनगर समाजाला लागू केल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाची प्रगती होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

0 0 votes
Article Rating
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments