मुंबई (रोखठोक महाराष्ट्र ब्रेकिंग)
छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शिवसेनेत असताना शिवसैनिकांनी भरपूर प्रेम दिलं. पण काही निर्णय घ्यावे लागतात. देश पातळीवरील राजकारणात सध्या अस्वस्थता आहे. तसंच तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या सगळ्याला केवळ एकच व्यक्ती न्याय देऊ शकते ते म्हणजे शरद पवार, असं कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
झी टीव्हीवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी बंद करण्यासाठी शिवसेना-भाजपकडून अमोल कोल्हे यांच्यावर दबाव येत होता.
या मालिकेत संभाजी महाराजांबद्दलच्या अनेक गैरसमजांना आणि खोटया इतिहासाला उघडे पाडत संभाजी महाराजांचा खरा इतिहास अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण दाखवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर आयुष्यात आणि संभाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत रायगडावरच्या ब्राम्हण कारभाऱ्यांनी कशी कटकारस्थाने केली ते देखील मालिकेत दाखवले जात आहे. त्यामुळेच शिवसेना-भाजपकडून अमोल कोल्हे यांच्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी दबाव येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात असेही बोलले जात आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. अमोल कोल्हे यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
