![]()
![]()
हडपसर /पुुणे (रोखठोक न्युज)
वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांचे आयुष्य खूप धकाधकीचे असते या क्षेत्रात प्रॅक्टिस करताना शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त रहावे याकरिता डॉक्टरांनी विविध स्पर्धांचे आयोजन करावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कार फोटो संजय टकले यांनी केले.
इंडियन डेंटल असोसिएशन हडपसरच्या वतीने येथील एस. एम. जोशी महाविद्यालयांमध्ये बॅडमिंटन कॅरम वॉचेस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील डेंटल डॉक्टरांसाठी करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय टकले बोलत होते.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सिद्धाराम राऊत डॉ. चेतन मस्के डॉ. राहुल झांजुर्णे, डॉ.सचिन आबने, हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. चेतन म्हस्के डॉ. सुहास लोंढे, डॉ.रसिका शिवरकर, डॉ. तानाजी हंबीर डॉ. योगेश सातव व यावेळी महाराष्ट्रातून आलेले डेंटल डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉक्टरांनी आपल्या जीवनात रुग्ण सेवा करीत असताना आपल्या कुटुंबाकडे व आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सुनील तांबे व डॉक्टर सिद्धाराम राऊत यांनी यावेळी बोलताना केले.
स्पर्धेचे संयोजन असोशियनचे अध्यक्ष डॉ. जयदीप फरांदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.स्मिता झांजुरणे, डॉ.आनंद भन्साळी, डॉ.अक्षय राऊत, डॉ.सौरभ बिर्ला, डॉ. अनिकेत कुगावकर, डॉ. उत्तरा राऊत, डॉ.ओंकार हरिदास, डॉ. सोनाली खेडेकर, डॉ. जयश्री आव्हाड, डॉ. ममता ढवळे डॉ. राजू नायक, डॉ. जागृती दहिलकर, डॉ. सोनम शिंदे, डॉ. प्रवीण मोरे, डॉ.अक्षय साखरे, डॉ. अपूर्वा साहू, डॉ. रोहित गांधी यांनी केले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, संगमनेर, औरंगाबाद, पुसद, या भागातून 90 स्पर्धक सहभागी झालेले आहेत.

