पुणे

मांजरीत अपघातांचे सत्र! पथदिवे बसवले… पण पेटलेच नाहीत | शिवसेनेचे हळद-कुंकू आंदोलन

मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे.
रेल्वे उड्डाणपुलासह लगतचे सेवा रस्ते, मुळा-मुठा नदीपर्यंतचा मुख्य रस्ता, मोरे वस्ती, भापकर मळा, गोपाळपट्टी चौक, द्राक्ष बागायतदार संघ, मांजरी गावठाण, गोडबोले वस्ती, घावटे वस्ती, मांजरी-मुंढवा रोडसह अनेक प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे नसल्यामुळे किंवा बंद असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या गंभीर समस्येबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या दोन वर्षांपासून पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग व पीएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला.
सप्टेंबर 2025 मध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन करण्यात आले होते.
नोव्हेंबर 2025 मध्ये पथदिव्यांचे खांब उभे राहिले, रंगरंगोटीही झाली…
पण फेब्रुवारी 2026 उजाडला तरी एकही पथदिवा सुरू नाही!

 

 

खांब आजही धूळ खात पडून आहेत.
या प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
या पथदिव्यांवर हळद-कुंकू, अबीर-बुक्का, श्रीफळ, हार अर्पण करून अगरबत्ती ओवाळण्यात आली.
प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी आणि लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत, अशी प्रार्थना करण्यात आली.
या आंदोलनात प्रवीण रणदिवे, गणेश घुले, संतोष ढोरे, गणेश मरळ, उमेश शिखरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.