पुणे

सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून कार्य करावे पंकज भडागे यांचे प्रतिपादन – लाईफ कोच पंकज भडागे यांचा धर्मवीर शंभुराजे अनाथालयातील विद्यार्थ्यांशी संवाद

हडपसर : आपल्या यश – अपयशात आपल्या विचारांच्या शक्तीचा मोठा वाटा असतो. याची जाणीव करून देवून लोकांचे आयुष्य बदलण्याचे काम लाईफ कोच, माईंडसेट ट्रान्सफॉर्मेशन ट्रेनर पंकज भडागे गेली अनेक वर्ष करीत आहेत. त्यांनी आज तुकाई दर्शन येथील त्रिमूर्ती बहुउद्देशीय मंडळ संचालित धर्मवीर शंभुराजे अनाथालयातील विद्यार्थ्यांशी हसत – खेळत विविध विषयावर संवाद साधला.

यावेळी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, अभिनेते प्रशांत बोगम आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकज भडागे म्हणाले, ‘चांगला विचार कर सगळं चांगल घडेल’, असे आपल्या घरातील आई – वडील, आजी-आजोबा सांगतात. मात्र आपण त्याकडे फारस लक्ष देत नाही, अन् नैराश्यात जातो. खरतर भौतिक सुखाच्या मागे धावत असताना, सामाजीक बांधीलकी ची जाण ठेवून केलेले कार्य, माणसातली माणुसकी जिवंत ठेवते असा संदेश भडागे यांनी विद्यार्थ्यांना दिला.