पुणे

कसबा निवडणुकीत पुणेरी पाट्यानी वेधले लक्ष – सोने, चांदी, पैसे सर्व काही स्विकारले जाईल, मत मात्र… रवी धंगेकरांना

पुणे (प्रतिनिधी)
कसबा पोटनिवडणुकीत, सोने, चांदी, पैसे सर्व काही स्विकारले जाईल, मत मात्र….! असे लावण्यात आले फलक भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कसबा मतदार संघात अशा पाट्यांची चर्चा पुणे येथील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा विधानसभा मतदारसंघ.
https://youtu.be/hGqJ6FvRgAY
या मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत होत असताना मतदारसंघात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. या मतदारसंघात वाडे, सोसायटी तसेच मोकळ्या जागेवर काही असे छोटे फलक लावण्यात आले “येथे सोने, चांदी, पैसे” इत्यादी सर्वकाही स्वीकारले जाईल अशा पाट्या सर्वत्र लावल्याने निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे. विशेष म्हणजे या पाट्या लावल्या असताना यावर मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल असे नमूद केले आहे.
https://youtu.be/oUkZdYSEbnk
यंदा कसब्यात धंगेकरच असे फलक, पाट्या लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात ठिकठिकाणी लावलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा होत आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना ठिकठिकाणी असे फलक लावलेले असल्याने हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.
https://youtu.be/bMQnb8M3aw4
फक्त तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या या पोटनिवडणुकीसाठी सगळे पक्ष जोरदार तयारी करत असताना या पुणेरी पाट्यांची एन्ट्री झाल्याने काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असता भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व इतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रचारामध्ये उपस्थिती लावली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आशा नेत्यांनी या मतदारसंघात प्रचाराच्या सभा व रोडशो घेत यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर व भाजपा शिवसेना युतीचे हेमंत रासने यांच्यातील लढत अतिशय चुरशीची होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. पदयात्रा कोपरा सभा रॅली शो प्रचार फेऱ्या सभांमुळे रंगत वाढली आहे.
https://youtu.be/8PgxtucbYbA
यंदा कसब्यात धंगेकरच असे फलक लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. या चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.