पुणे

साने गुरुजी आरोग्य केंद्रात रोटरी क्लबच्या सहाय्याने अतिदक्षता विभाग अत्याधुनिकीकरण

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
साने गुरुजी आरोग्य केंद्र हे गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात आरोग्य सेवा देत आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोने आजपर्यंत अनेक प्रकल्प साने गुरुजी आरोग्य केंद्रात केले आहेत. शनिवारी दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ग्लोबल ग्रांटच्या माध्यमातून केलेल्या ‘अतिदक्षता विभाग अत्याधुनिकीकरण’ या ३५ लाखांच्या प्रकल्पाचा हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. या प्रकल्पात रोटरी पुणे मेट्रोसह शिवाजीनगर, कात्रज, डेट्रॉईट, अँन अर्बन नॉर्थ या भारतीय व अमेरिकन क्लबची मदत झाली, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव मा. श्री . अनिल गुजर यांनी दिली.
कार्यक्रमात रोटरीचे पदाधिकारी पूर्व प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, अध्यक्ष मेट्रो स्नेहा सुभेदार, सचिव मेट्रो सुरेखा देशपांडे, रो. गौतम सातपुते, डॉ. स्मिता जोग (शिवाजीनगर), रो. किर्ती बनसाली (कात्रज) रो. विवेक कुलकर्णी, रो. मुकुंद चिपळूणकर, रो. मकरंद फडके उपस्थित होते.
प्रकल्पाचे सादरीकरण सानेगुरुजी आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक डॉ. सुशील देशमुख यांनी केले व सूत्रसंचालन रो. माधवी कुलकर्णी यांनी केले.