पुणे

तुकाई टेकडी येथिल श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन उत्साहात साजरा

तुकाई टेकडी येथिल श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.पुर्वसंध्येला स्वामींच्या पादुका भेकराई माता मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरात पालखी द्वारे मिरवणूकीने वाजत-गाजत आणल्या.

 

सकाळी ८ ते१० मान्यवरांचे हस्ते रुद्राभिषेक व विधीवत पुजा मोरेश्वर कुलकर्णी यांनी पार पाडली.दुपारी २ ते ५ राधाकृष्ण भजनी मंडळ तुकाई दर्शन यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. सांयकाळी ७.३० वा. शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे व हवेली मा.पं.स.सदस्य शंकर हरपळे यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. सांयकाळी ८ते११ पद्मिनी संगीत विद्यालय प्रस्तुत शास्त्रीय नृत्य गायन बासरी वादनाच्या कार्यक्रमाने श्रोते भाविक मंत्र मुग्ध झाले होते.यावेळेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ होले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रविण होले शादाब मुलाणी भुषण चव्हाण सलिम मुलाणी धिरज गायकवाड ओम राऊत ओंकार सातव शैलेश काळभोर यासह असंख्य स्वामी भक्तांनी प्रयत्न केले.

 

प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विकास रासकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख,अमोल हरपळे,शिवसेना महिला उपशहर प्रमुख विद्या होडे,तालुखा प्रमुख बसंती श्रीवास्तव,काँग्रेसच्या पल्लवी सुरसे,मा.पं.स.सदस्य रोहिणी राऊत,भाजपा उपजिल्हाप्रमुख राहुल शेवाळे,मा.नगरसेवक मारुती तुपे,गणेश ढोरे यासह असख्यं भाविकांनी स्वामींचे दिवसभरात दर्शन घेतले.