पुणे

दोन वर्षाकरिता तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास अटक, प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन बंदोबस्ता निमित्त वरिष्ठांच्या आदेशने तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक गोरे व स्टाफ यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारी व सराईत गुन्हेगारी चेक करण्यासाठी हद्दीत गस्त घालण्याचे आदेश दिले असता त्यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की दोन वर्ष तडीपार असणारा सराईत गुन्हेगार राज पवार हा गणपती विसर्जना निमित्त एका गणपती मिरवणुकीला कवडीपाट येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक गोरे यांनी वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशावरून गोरे व स्टाफ ने कवडीपाट तेथे सापळा रचला असता त्यांना राज पवार गणपती विसर्जन मिरवणुकी मध्ये दिसून आला.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ , पुणे शहर यांच्या तडीपार आदेशा नुसार दोन वर्षां करता पुणे शहर, व पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले असताना देखील तडीपार आरोपी राज पवार याने पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ , यांची कोणतीही परवानगी न घेता पुणे शहर प्रवेश करून आदेश भंग करून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील हद्दीत कवडीपाट (कदमवाक् वस्ती) या ठिकाणी मिळून आला असल्याने आरोपी राज पवार यास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस आधीनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
पुढील तपास लोणी काळभोर शहर पोलीस चे पोलीस उप निरीक्षक गोरे करीत आहे.